नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना प्रवक्त्या
डाँ.नीलम गोऱ्हे यांचे एनयुजे महाराष्ट्र ने मानले आभार!
स्व.रोशन डायस व स्व.पांडूरंग रायकर यांचे कुटुंबियांना ५०लाखाची वीमासुरक्षा रक्कम तातडीने मिळावी

सांगली/प्रतिनिधी:
टिव्हि९ मराठीचे पत्रकार स्व.पांडुरंग रायकर यांचे कुटुंबियांना एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री महाराष्ट्र यांनी ५लाख रुपये दिले असून त्याचा धनादेश आज टिव्ही९ चे हैद्राबाद येथील कार्यालयात देण्यात आला.तातडीने केेेेलेल्या सहायतेसाठी एकनाथजी शिंदे यांचे आम्ही आभारी आहोत.
शिवसेना प्रवक्त्या आमदार डाँ.नीलमताई गोऱ्हे यांनीही तातडीने एक लाख रुपयेची सहायता रायकर कुटुंबियांना दिली होती! त्यांचेही आभार नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर
यांनी मानले.
तसेच येत्या काळात लवकरात लवकर टिव्ही९मराठीचे कर्मचारी स्व रोशन डायस व स्व पांडूरंग रायकर यांचे कुटुंबियांना सरकारकडून ५०लाखाची वीमासुरक्षा रक्कम मिळावी आणि ज्या चँनलवर हे दोघेही काम करत होते त्यांनी संवेदनशीलपणे कुटुंबियांना सर्वतोपरी आधार द्यावा असे आवाहन एनयुजे महाराष्ट्र च्या वतीने करण्यात आले आहे!

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक