अनिल मदने
जत /प्रतिनिधी :
मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी जत तालुक्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे लक्ष द्यावे,अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेना राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात शेवटचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणाऱ्या जत तालुक्यामध्ये कायमपणे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे.जत तालुका हा महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरती असल्याने इथे कन्नड भाषिकांची संख्या जास्त आहे. पण हा तालुका विकासापासून वंचित आहे, या तालुक्याला म्हैशाळ योजनेचे अजूनही पाणी पोहचले नसून 42 गावांच्या पाणीप्रश्नासाठी कित्येक आंदोलने ,पाठपुरावा करून झाले. पण शासनाने इकडे कानाडोळा केला आहे. शिवसेनाप्रमुख स्व.हिंदुह्दयम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळी जत तालुक्यात कायम सत्ता असो वा नसो, चारा छावण्या व जनावरांसाठी खाद्य पुरवठा करायचे व जातीने लक्ष द्यायचे.आता तर शिवसेनेची सत्ता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनीही अत्यंत जातीने लक्ष देऊन जत तालुक्यातील शिवारात पाणी पोहचवावे व अनेक समस्यांवर मार्ग काढावा. मुख्यमंत्र्यांनी एकदा जत तालुक्याचा दौरा करुन जतवासियांच्या चेहर्यावर आनंदाचे स्मितहास्य फुलवावे अशी मागणी दिनकर पतंगे साहेब यांनी केली आहे.
जत तालुक्याचा विभाजन प्रश्न, म्हैसाळ योजनेला निधी उपलब्ध करुन कामाला गती देऊन जतला पाणी सोडावे, शैक्षणिक क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल करावे व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा. तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मोफत केंद्र उपलब्ध करून द्यावे, तालुक्यातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना न्याय मिळवा. या व अशा अनेक मागणींसाठी लवकरच महाराष्ट्र कामगार सेना राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे व त्यांचे संपूर्ण शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन