राजेवाडीतील शिक्षक प्रकाश पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

देवानंद जावीर
आटपाडी/ प्रतिनिधी:

आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या दिघंची येथील दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक, राजेवाडी गावचे सुपुत्र प्रकाश भिमराव पाटील यांचे वयाच्या 46 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.बाबासाहेब देशमुख बॅन्केचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे ते धाकटे बंधू होते.त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
कोरोना काळात त्यांनी आरएसपीच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा बजावली होती.त्यांच्या निधनाने राजेवाडी परिसरात व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.