आटपाडी/प्रतिनिधी:

शेटफळे येथील रोजगार हमीचे काम न करता बिल काढल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,शेटफळे येथे शिवचामळा रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून मंजूर असून त्या ठिकाणी कोणतेही काम न करता कामाचे तीन ते चार मास्टर काढले आहेत. रोजगार हमीचे काम हे प्रत्यक्ष लोकांकडून करायचे असते, परंतु ते काम ट्रॅक्टर,जेसीबीच्या साह्याने केले. त्याचे पुरावे असून हे काम चालू नसताना ज्या अधिकाऱ्याने बिल काढून दिले आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्यावतीने चार ते पाच दिवसात पंचायत समिती आटपाडी येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी निवेदनात दिला आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन