पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे आटपाडी तालुक्यातील जनतेने केले अभिनंदन!

देवानंद जावीर/आटपाडी:
                              
राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी महापुराचे वाहून जाणारे पुराचे पाणी टेंभु योजनेमार्फत दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेऊन दुष्काळी भागाला मोठा न्याय दिला आहे.
महापुराचे कर्नाटकला वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला द्यावे, यासाठी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले होते. तसेच भाजप सरकारच्या कार्यकालात सातत्याने आंदोलन करून या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. परंतु शेतकरी हिताच्या आड येणाऱ्या तसेच स्वतःला शेतकरी म्हणणारे त्या वेळचे भाजपचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय दुष्काळी भागाला पाणी देणार नाही. अशी भूमिका घेत शेतकर्‍यांना फुकट पाणी द्यायला पैसे काय झाडाला लागतात का?असे बेजबाबदार वक्तव्य करून अक्षरशः शेतकऱ्यांची अवहेलना करत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वेठीस धरले. 
एवढ्या मोठ्या प्रमाणात कृष्णा खोऱ्यातील पाणी वाहून वाया जात असतानासुद्धा या पाण्याचा एक थेंबही दुष्काळी भागाला मिळणार नाही .मागील दोन वर्षात अशी परिस्थिती होती की जिल्ह्यात एका बाजूला महापौर व अतिवृष्टी तर दुसऱ्या बाजूला जनावरांची छावणी व टॅंकरने पाणीपुरवठा अशी भयानक परिस्थिती असताना सुद्धा तात्कालीन भाजप सरकार दुष्काळी भागातील जनतेबरोबर अतिशय क्रूरपणे वागले. अशा परिस्थितीमध्ये जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. आटपाडी तालुक्यामध्ये शासनाने जनावरांच्या छावण्या काढाव्यात व जळीत डाळींबाचे पंचनामे करावेत व दुसरी दुष्काळी भागाला महापुराचे वाहून जाणारे पाणी टेंभू योजनेतून सोडावे अशी जाहीर मागणी केली .परंतु त्यावेळच्या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची  मागणी धुडकावून लावत आटपाडी तालुक्यावर फार मोठा अन्याय केला. 
जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्याची तालुक्यातून मागणी केली. त्याप्रमाणे आटपाडी तालुक्यातील हजारो शेतकरी व जनावरे घेऊन जिल्ह्यातील सर्व दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून शासनाला चारा छावण्या काढण्यास भाग पाडले.
परंतु महापुराचे वाहून जाणारे पाणी पैसे भरल्याशिवाय देणार नाही अशी भूमिका घेऊन भाजप सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले.परंतु त्यानंतर काही महिन्यातच हे भाजपचे सरकार जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार आले आणि जयंतराव पाटील हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने दुष्काळी भागाला न्याय मिळाला मिळू लागला व टेंभू योजनेची कामे झपाट्याने होऊ लागली.
मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कृष्णा नदीला महापूर आला व पुराचे वाहून जाणारे पाणी जयंतराव पाटील यांनी दुष्काळी भागाला शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेता टेंभू योजना सुरू करून दुष्काळी भागातील सर्व तलाव  भरून पाणी सोडले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये अजूनही पाऊस पडला नाही. नाल्याला पाणी नाही. अशा परिस्थितीत टेंभू योजना चालू करून या भागाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. आम्ही आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी,जनतेच्यावतीने विशेष अभिनंदन करीत आहेत. दुष्काळी भागाला यापुढे विशेष लक्ष देऊन टेंभू योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी या भागाचा दौरा करून टेंभू योजनेचा बंद पाईपलाईन व साठवण तलावाची पाहणी करून आटपाडी तालुका सुजलाम सुफलाम करावा व येथील शेतकऱ्यांना समृद्ध करावे .अशी आटपाडी तालुका पार्टीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. आम्ही सर्व जनतेच्या वतीने पुन्हा एकदा जयंतराव पाटील  यांचे  अभिनंदन करून धन्यवाद देतो असे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले.