
राज्य शासनाच्या जुन्या पेन्शन भूमिकेबद्दल शिक्षक, सह सर्व कर्मचाऱ्यांमध्ये रोष..
हजारो कर्मचारी यांची यशवंत स्टेडियम नागपूर येथे उपस्थिती…
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
२००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करत शुक्रवारी (दि. १२) नागपूर येथे महामोर्चा करण्यात आली. मोर्चात राज्यभरातील शिक्षकांसह इतर सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाची जुन्या पेन्शन बद्दलची भूमिका स्पष्ट नसल्याकारणाने हजारो कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध जनक्रांती महामोर्चाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला .
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून सांगली जिल्ह्यातून अमोल शिंदे ,सागर खाडे ,स्वप्निल मंडले नेताजी भोसले नितीन गळवे रमेश मगदूम, गुरु बसू वाघोली यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे.आता हा लढा महाराष्ट्र आणि देशव्यापी बनला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनामुळे शासनाने कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केंद्र शासनाने नवीन पेन्शन योजनेत बदल करत युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे. मात्र, पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणारी कपात आणि शेअर बाजार आधारित पेन्शन योजनेला राज्यभरातील लाखो कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन योजना पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी मागणी पेन्शन जनक्रांती महामोर्चा नागपूर काढत मागणी करण्यात आली. राज्यभरातून विभागांचे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने नागपूर मोर्चात सहभागी झाले होते.
२००५ नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन लागू केले आहे. पेन्शन, ग्रॅच्युईटी, १० लाख सानुग्रह अनुदान, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार आहे. परंतु, सर्व शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी, म्हणूनच नागपूर येथे मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातून बहुसंख्येने शिक्षक व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
शासनाने पेन्शनसाठी वेगवेगळ्या योजना न आणता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अन्यथा यापेक्षाही कठोर आंदोलन जुन्या पेन्शन संघटनेच्या माध्यमातून उभा करू _स्वप्निल मंडले सचिव जुनी पेन्शन संघटना सांगली . कार्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक समन्वय समिती सांगली
आम्ही सुधारित पेन्शन योजनेच्या शासन शासन निर्णय यांचा जाहीर निषेध करतो. आम्हाला सुधारित नको जशीच्या तशी 1982 ची जुनी पेन्शन योजनाच पाहिजे- नितीन गळवे


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती