लेफ्टनंट प्रा. विजय शिंदे यांना पीएच.डी. पदवी


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथील मराठी विभाग प्रमुख व एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विजय पांडुरंग शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून “माणदेशातील लोकदैवतविषयक लोकसाहित्याचा अभ्यास” या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
यानिमित्ताने दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. अमरसिंह बापू देशमुख यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सदाशिव मोरे, डॉ. उत्तम मोटे, प्रा. प्रभाकर जाधव, डॉ. अंकुश कोळेकर, डॉ. संदीप विभुते, डॉ. हणमंत सावंत ,प्रा.परमेश्वर झाकडे,श्री.दिनेश देशमुख ,श्री.कैलास सावंत, किरण देशमुख उपस्थित होते.

या संशोधनात माणदेशातील लोकदैवते, लोककथा, लोकगीते, लोकमानस आणि क्षेत्रपाल संकल्पना यांचा अभ्यास करण्यात आला असून ग्रामीण लोकसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. गावोगावी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष क्षेत्रकार्यामुळे या अभ्यासाला अनुभवाधारित अधिष्ठान लाभले आहे.

 या संशोधनासाठी अणदूर ता.तुळजापूर (जि. धाराशिव) येथील जवाहर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. राजशेखर नळगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे ,डाॅ.नंदकुमार मोरे,तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डाॅ.दासू वैद्य व डॉ. कैलास अंभुरे , डॉ. चंद्रकांत पोतदार ,डाॅ.कृष्णा इंगोले,डाॅ.सयाजीराजे मोकाशी,

कै.प्रा.विश्वनाथ जाधव,डाॅ.विजय लोंढे,डाॅ.सदाशिव मोरे, डाॅ.रामदास नाईकनवरे यांचे मार्गदर्शन लाभले. डाॅ.रुपेशकुमार कदम, प्रा.संतोष बोंगाळे,डाॅ.दत्ता घोलप,डाॅ.रमेश शिंदे,डाॅ.नवनाथ गुंड,डाॅ.संदीप दळवी,डाॅ.मांतेश हिरेमठ ,प्रा.समाधान गायकवाड , सूरज कुंभार,किरण देशमुख यांचे विशेष सहकार्य केले.

प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक पातळीवर सातत्याने मार्गदर्शन करणे, तसेच एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्व व राष्ट्रभावना रुजविणे हे कार्यही लेफ्टनंट प्रा. शिंदे करत आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांमध्ये त्यांनी जबाबदारीची पदे भूषवली आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले तसेच संस्थेचे चेअरमन अमरसिंह बापू देशमुख,उपाध्यक्ष डाॅ.सुभाष कारंडे,सचिव एच.यू.पवार,निरीक्षक प्रकाश नामदास,निरीक्षक अशोक चौगुले,निरीक्षक अरुण गायकवाड व संस्थेचे सर्व पदाधिकारी ,महाविद्यालयातील सर्व स्टाफ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
  आटपाडी हीच जन्मभूमी व कर्मभूमी मानून शिक्षण व समाजकारणात कार्यरत असलेल्या लेफ्टनंट प्रा. शिंदे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.