
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता अभियान, तसेच निबंध व वक्तृत्व स्पर्धा अशा बहुआयामी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सदाशिव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे उत्कृष्ट नियोजन समितीतील डॉ. शिवाजी विभुते, प्रा. संजय हजारे, डॉ. अमोल मोरे, प्रा. विजय शिंदे, डॉ. संदीप विभुते, डॉ. हणमंत सावंत, डॉ. रुपेश कदम, प्रा. संताजी लोखंडे, प्रा. गौरव चव्हाण, प्रा. अजित जाधव, प्रा. आबासाहेब जाधव, प्रा. अनिल पाटील यांनी केले.
या शिबिरात स्टाफ व विद्यार्थी मिळून १७० जणांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, आटपाडी यांच्या पथकाने केली. रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज यांच्या तज्ज्ञ पथकाने पार पाडली. या पथकात रक्त संकलन अधिकारी डॉ. रसिका सावंत, तसेच डॉ. ऋतुजा सालविठ्ठल, डॉ. कार्यदीप लोंढे, डॉ. गुलाब देवकुळे, डॉ. सुवर्णा शिरोडकर, डॉ. काळे (पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन), डॉ. लवटे, तसेच वैद्यकीय स्टाफमधील डाॅ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल कदम, धर्मेंद्र ढवळे, शहाणाज मुल्ला, मेहर अली कलाल,आजिया मुल्ला, मंजुश्री पाटील, सविता माळी, इंदुमती यलमार यांनी मनापासून सेवा बजावली. शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेची परंपरा जपली.
वर्धापन दिनाचे औचित्य साधत NSS व NCC च्या स्वयंसेवकांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन दिवस स्वच्छता अभियान राबवले. महाविद्यालय परिसर, तसेच महाविद्यालय ते अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली.
या बरोबरच मराठी विभागाच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धांनाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यजागृती, समाजभान, स्वच्छता व शैक्षणिक स्पर्धात्मकतेचा उत्कृष्ट संगम साधत वर्धापन दिनाचे उपक्रम मोठ्या यशस्वीतेने पार पडले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती