
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड (ता. माण)
माण तालुक्यातील हिंगणी गावात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपासून ते बुधवारी 08 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत बंडु अंकुश घुटुकडे (रा. हिंगणी, ता. माण) याने आपल्या पत्नी आनिता बंडु घुटुकडे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लाकडी दांडा व लोखंडी घनाने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आनिताचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपी बंडु घुटुकडे याने स्वतः विषारी औषध प्राशन करून पत्र्याच्या शेडच्या अँगलला रबरी पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुहेरी घटना हिंगणी गावच्या आसळओढा परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ घडली.
या प्रकरणी ज्ञानेश्वर वस्ताद झिमल (रा. गंगोती, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा रजि. क्रमांक 325/2025, कलम BNS 103(1) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, तसेच सपोनि अक्षय सोनवणे (म्हसवड पोलीस ठाणे) यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती