
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची
पुणे येथे पार पडलेल्या लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये आटपाडी तालुक्यातील दिघंचीची सुकन्या माया रणदिवे हिने लक्षवेधी भुमिका मांडली. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) पुढाकाराने झालेल्या पहिलेच साहित्य संमेलन मान्यवरांच्या सहभागाने चर्चेत आले.
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. शाहीर वंदना, अण्णाभाऊंच्या छायाचित्रांचे प्रदर्शन,अण्णाभाऊंच्या कथा-कादंबऱ्यातील अभिव्यक्ती या विषयावरील परिसंवाद, त्यांच्या साहित्यातील राष्ट्रीय भुमिका व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदानावर परिसंवादात मान्यवरांनी सहभागी होवुन चर्चेला उत्तुंग व्यासपीठावर नेले.गजल मुशायारा, कवी संमेलन, गाथा लोकशाहीरांची अशा कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचीही उत्स्फुर्त दाद मिळाली.
याच साहित्ये संमेलनात आटपाडी तालुक्यातील दिघंचीची सुकन्या माया रणदिवे हिने अण्णाभाऊ साठेंच्या जिल्हयाचे प्रतिनिधीत्त्व करत अण्णाभाऊंच्या कथा-कादंबऱ्यातील अभिव्यक्तीवर परिसंवादात सहभाग नोंदविला. ‘फकीरा’ कादंबरी व त्यातील अभिव्यक्ती यावर त्यांनी मांडलेली भुमिका कौतुकास पात्र ठरली.यावेळी उपस्थित जेष्ठ साहित्यिक व समाजबंधवानी त्यांच्या मनोगताचे भरभरून कौतुक केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपला समाज-राज्य, दिनदलित, उपेक्षित, कष्टकरी, कामगारांसाठी केलेले कार्य माया रणदिवे हिने मांडले.
अण्णाभाऊंच्या साहित्य, पोवाडे, कथासंग्रहातून तरुण पिढीने आदर्श घेवुन वाटचाल करायला केली पाहिजे, अशी भुमिका माया रणदिवे यांनी मांडली. दिघंचीसारख्या ग्रामीण भागातून कायदेविषयक अभ्यास करताना समाजसेवेची आवड आणि आपल्या महापुरुषांकडून मिळालेल्या आदर्शाच्या मार्गाने आपण देखील समाजासाठी योगदान दिले पाहिजे, अशी भुमिका त्यांनी व्यक्त केली.
एलएलबीचे शिक्षण घेत असताना सामाजिक आवडीतून महापुरूषांनी समाजाला एकसंघ करण्यासाठी केलेले कार्य पुन्हा-पुन्हा समाजासमोर आले पाहिजे, अशी भुमिका माया रणदिवे मांडतात. “आली जरी कित्येक संकटे नारी तुला-हार तू कधी मानू नको” असा संदेश आपल्या काव्यातुन दिला. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) विविध उपक्रमांची माहिती समाजातील सर्व घटकांना झाली पाहिजे, असे आवाहन करणाऱ्या रणदिवे यांनी व्यासपीठावर मांडलेल्या भुमिकेचा आनंद व्यक्त केला.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती