
६ खासदार, १४ आमदार, ६ माजी आमदार महोदयांसह अनेकांनी दिले समर्थन
सादिक खाटीक यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला लक्षवेधी यश
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
राजेवाडी तलाव प्रश्नी आणखी ५ मान्यवर महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहून राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने १४० वर्षात आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लक्ष वेधले आहे .
कोल्हापूरचे काँग्रेस आयचे खासदार छत्रपती शाहुजी महाराज साहेब , शिराळ्याचे भाजपा आमदार सत्यजित देशमुख साहेब , शिराळ्याचेच माजी आमदार, माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, काँग्रेस आयचे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ट नेते माजी आ . मोहनरावशेठ कदम सोनसळ कडेगांव, भाजपाचे सांगली जिल्ह्याचे नेते माजी आ. पृथ्वीराजबाबा देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस साहेब यांना खास पत्रे लिहून राजेवाडी तलाव प्रश्नी लक्ष वेधले आहे .
आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार, शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी या मान्यवरांना साकडे घातले होते .
राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे नाव शासनस्तराव राजेवाडी तलाव असे केले जावे . या तलावाचे फलटणचे मुख्य व्यवस्थापन सांगली जलसंपदाकडे वर्ग व्हावे . पंढरपूरचे उपमुख्य व्यवस्थापन आटपाडीतून सुरू केले जावे . महुद च्या शाखा कार्यालया बरोबरच राजेवाडीतही शाखा कार्यालय सुरू केले जावे . राजेवाडी तलाव बारमाही वाहता केला जावा . राजेवाडी तलावाच्या नव्या कॅनॉलने आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव एकमेकांशी जोडले जावेत वगैरे महत्वपूर्ण मागण्याच्या अनुषंगाने सादिक खाटीक यांनी सातत्याने शासनाकडे आवाज उठविला आहे. अनेक मान्यवर महोदयांना साकडे घातले आहे .
सोमवारी दि . १२ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे शिष्टमंडळ भेटीच्या प्रसंगाने सादिक खाटीक यांनी राजेवाडी प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरदचंद्रजी पवार साहेबांना निवेदन देवून त्यांचे लक्ष वेधले .
राजेवाडी तलाव प्रश्नी सर्वश्री खा . विशालदादा पाटील सांगली, खा . सुप्रियाताई सुळे बारामती, खा . छत्रपती शाहुजी महाराज कोल्हापूर, खा . डॉ . फौजिया खान परभणी, खा . अमोल काेल्हे शिरूर पुणे, खा .अमर काळे वर्धा या ६ खासदार महोदयांनी, आ . सुहास बाबर खानापूर, आ . गोपीचंद पडळकर जत, आ . डॉ . बाबासाहेब देशमुख सांगोला, माजी मंत्री, आ . सुरेशभाऊ खाडे मिरज, आ . सुधीरदादा गाडगीळ सांगली, आ . सत्यजीत देशमुख शिराळा, आ . इद्रिस नायकवडी मिरज, आ . रोहीत आर . आर . आबा पाटील तासगांव – कवठेमहकाळ, आ . विश्वजीत कदम पलुस – कडेगांव, आ . उत्तमराव जानकर माळशिरस, आ . जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ . बापूसाहेब पठारे वडगाव – शेरी पुणे, आ . अभिजित पाटील माढा या विद्यमान १४ आमदार महोदयांनी, माजी आ . राजेंद्रआण्णा देशमुख आटपाडी, माजी आ. ॲड शहाजीबापू पाटील सांगोला, माजी आ. दीपकआबा साळुंखे – पाटील सांगोला, माजी मंत्री, माजी आ . शिवाजीराव नाईक साहेब शिराळा, माजी आ . मोहनशेठ कदम सोनसळ, ता .कडेगाव, माजी आ . पृथ्वीराजबाबा देशमुख या ६ माजी आमदार महोदयांसह, सांगली जि . प . चे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख आटपाडी, आटपाडीचे सुपुत्र एबीपी माझा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, पाणी चळवळीचे नेते डॉ . भारत पाटणकर कासेगांव वाळवा, दै . जनप्रवास सांगलीचे संपादक संजय भोकरे या मान्यवर महोदयांनी समर्थन दिले आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती