
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यावे. पायाभूत सुविधा उभारणीकडे लक्ष केंद्रीत करावे. आटपाडी बाजार समितीप्रमाणे जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी राज्यस्तरीय रॅकिंगमध्ये पहिल्या 25 मध्ये येण्याच्या दृष्टीने कामकाज करणे आवश्यक आहे, असे आवाहन कृषि पणन मंडळ कोल्हापूरचे विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव- दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील 7 बाजार समितींच्या सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांच्याकरीता आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, डी.एम.आय.चे अच्युत सुरवसे, सहकार विभागाचे अधिकारी तात्यासाहेब मुरूडकर, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, शेखर कोंडे, नवनाथ मोरे, बाजार समितींचे पदाधिकारी व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले डॅा.सुभाष घुले यांनी पणन मंडळाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डीएमआयचे अच्युत सुरवसे यांनी डारेक्टरेट ऑफ मार्केटींग यांच्या बाजार समिती व शेतकरी यांच्याकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सहकार विभागाचे तात्यासाहेब मुरूडकर यांनी बाजार समितीचे अधिकार व जाबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राज्यस्तरीय रॅकिंगमध्ये आटपाडी बाजार समितीचा कोल्हापूर विभागात पहिला क्रमांक आल्याबद्दल बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पणन मंडळाचे ओंकार माने यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती