नंदकुमार विभुते
आटपाडी/प्रतिनिधी:

माडगुळे गावचे रहिवासी स्व. महादेव बापू गुरव यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील गरजूंना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे गोरगरिबांच्या हाताला रोजगार ,काम नाही .दैनंदिन खर्च भागवणे व कुटुंबाची होणारी उपासमार थांबवणे यासाठी चाललेली धडपड व कुटुंबातील होणारी उपासमार, त्यातच घरातील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदी करणे फार अवघड होऊन बसले आहे.
हीच गोष्ट लक्षात घेऊन व वडिलांची शैक्षणिक आवड लक्षात घेऊन प्रा. शशिकांत गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.सौ.कांचन गुरव या उभयतांनी गावातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे गावात व परिसरात एकच चर्चा सुरू असून त्या उभयतांना गावातील सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद