दमदार पावसाने बुलडाणा जिल्हा जलमय

सुभाष मोरे, बुलडाणा/प्रतिनिधी :
गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बुलडाणा जिल्हा जलमय झाला असून जिल्यातील सर्वच जलसाठयात मोठया प्रमाणात वाढ झाली असून येळगाव, उतावळीसह लघुपाटबंधारे १००टक्के भरले असून ईतर धरणाच्या सुध्दा जलसाठयात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे लघुपाटबंधारे ओव्हरफ्लो वाहात असल्याने व मोठया प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हया पावसामुळे नदीनाले तुडुंब वाहात असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणची वाहतुक ठप्प झाली होती हया पावसामुळे शेतातील पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे रब्बीच्या पिकाची आशा असली तरी खरिपाच्या पिकाच्या नुकसानीन शेतक-ची चिंता मात्र वाढली आहे.