माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे निधन;अर्धशतकाहून अधिक लोकसेवा करणारा नेता वैकुंठवासी !

संजय हुलगे /माळशिरस,प्रतिनिधी:

महाराष्ट्राच्या राजकारणातील  लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले . त्यांच्यावरील पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आहेत , अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे . त्यामुळे पंढरपुरातील परीचारकच्या वाड्यासह तालुक्यात शोककळा पसरली आहे .

सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या  राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्यांना एकदाच  राज्यस्तरावरील सत्तेत बसण्याची संधी आली त्यातही त्यांनी हे महामंडळ नफ्यामध्ये आणून आपल्या निरपेक्ष कार्याची प्रचिती दिली होती . अडचणीमध्ये – तोट्या मध्ये असलेले उद्योग फायद्यामध्ये आणून ते सभासदांचे आधारस्तंभ म्हणून  पुढे करण्याची त्यांची ख्याती होती. त्यांनी नव्याने उभे केलेले केलेला पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक ,  भीमा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले युटोपियन  शुगर , कर्मयोगी विद्यानिकेतन , त्यांच्या सहकार्याने उभे राहिलेले दामाजी साखर कारखाना आणि तालुक्यातील 50 हून अधिक सोसायटी,  दूध संघांचे जाळे हे हजारो लोकांना रोजगार देत आहेत .आपल्या राजकीय  कारकिर्दीत पाच वेळा आमदार होण्याचा माण मिळवला