मुख्तार मणियार, औसा /प्रतिनिधी:
शेती आणि घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट्सपर्यंतचे मासिक वापर करणारे सर्व ग्राहकांचे पूर्ण,५०० युनिट्सपर्यंतचे प्रत्येक ग्राहकांचे ५०% टक्के व ५०० युनिट्सच्या पुढील ३०% टक्के वीजबिल माफ करण्याची मागणी औसा तालुक्याच्यावतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना केली आहे.
एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार इम्तियज़ जलील, महाराष्ट्र प्रदेश कार्यअध्यक्ष गफ्फार कादरी,यांच्या आदेशानुसार या मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा १ सप्टेंबर २०२० पासुन राज्यभरात एम आय एम पक्षाच्या वतीने संविधानिक मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावेळी एम आय एम चे ज्येष्ठ नेते अॅड.गफुरुल्ला हाशमी, प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,न्यामत लोहारे,अजहर कुरेशी, इलियास चौधरी आदि उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती