रशिदा पापामियाँ खाटीक यांचे निधन

सादिक खाटीक, अनिस खाटीक यांना मातृशोक
प्रगल्भनायक

आटपाडी
आटपाडी येथील सुप्रसिद्ध महिला कार्यकर्त्या, कष्टाळू, हजरजबाबी, धाडशी, कणखर व्यक्तीमत्व श्रीमती रशिदा पापामियाँ खाटीक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु : खद निधन झाले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक , आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते मुस्लीम समाजाचे नेते अनिस खाटीक, भगिनी श्रीमती जुलेखा महेबूब खाटीक जमखंडी , सौ . फरिदा अब्दुल रतनपारखे विजापूर यांच्या त्या मातोश्री होत .

गत १० दिवसापासून आटपाडी येथील सुविधा हॉस्पीटल येथे अतिदक्षता विभागात त्यांचेवर उपचार सुरु होते . आज पहाटे ५ .३० वाजता त्यांचे निधन झाले . निधनसमयी त्यांचे वय ७८ होते . त्यांच्यामागे २ मुले, २ मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे, भाऊ, भावजयी, भाचे, भाची, असा मोठा परिवार आहे . पंढरपूर माहेर असलेल्या रशिदा खाटीक यांनी ६ दशके आटपाडी येथे अतिशय खडतर परिस्थितीत दिवंगत पती पापामियाँ आब्बास खाटीक यांच्या समवेत प्रपंच साधला होता .
आज दुपारी ४ वाजता आटपाडी पश्चिम कबरस्थान मध्ये दफनविधी केला आहे .