तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ माडगूळे यांच्यावतीने नवरात्र उत्सवात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

माडगूळे
माडगूळे येथील तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून नवरात्र निमित्त नऊ दिवसाच्या कालात विविध असे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करण्याचे ठरवले आहे या कार्यक्रमात देवींची गोंधळ गिते ,शाहिरी कार्यक्रम, आपल्याच गावातील चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य अशा डान्स स्पर्धा, वाघ्या मुरळी पार्टी, जादूचे प्रयोग, भारुड , महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम ,दुर्गाष्टमी निमित्त होम -हवन ,होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, महिलांसाठी खास संगीत खुर्ची ,महा रक्तदान शिबीर घेऊन ७६ युनिट रक्त गोळा केले या रक्तदान शिबिरात पुरुषाबरोबरच महिलानीही उस्फुर्त सहभाग नोंदविला, नेत्र रुग्णासाठी नेत्र शिबिर, असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून एक प्रकारचा समाजप्रबोधनाचा विडा उचललाआहे,
शुक्रवार दि, ११/१०/२०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा आटपाडी व तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ माडगूळे यांच्या संयुक्त विद्यमाने माडगूळे येथे महा मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजित केले आहे, या शिबिरात संपूर्ण डोळ्याची मोफत तपासणी केली जाईल ,लहान मुलांचे डोळे तपासणी, बुगुळाचे विकार व त्याची तपासणी, तिरळेपणा तपासणी ,मोतीबिंदू तपासणी डोळ्याच्या पडद्याची तपासणी करून डोळ्याचे अद्यावत मशीनद्वारे नंबर काढून सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे तरी सर्व डोळ्यांच्या रुग्णानी या नेत्र तपासणी शिबिराचा अवश्य फायदा घ्यावा असे आव्हान तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ माडगूळे व अनुराधा आय क्लीनिक आटपाडी यांच्या यांच्यावतीने करण्यात येत आहे