प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सुमारे 6:00 वाजता पांगरी (ता. माण) गावात एक दुर्दैवी घटना घडली. 19 वर्षीय ऋषिकेश संतोष जगदाळे या युवकाने त्यांच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला रशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच ऋषिकेशचे काका रोहित मानसिंग जगदाळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सपोनी.अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे करत आहेत.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती