दुधेभावी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा दोन ते तीन जणांना चावा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ

दुधेभावी येते शाळकरी मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा व अन्य काही नागरिकांना ही चावा घेन्याचा प्रयत्न यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे
आमना मोसिन खाटीक वय वर्ष 6 ही मुलगी काल रात्री घरी रस्त्यावरून जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली असून तरी या बालिकेवर मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत
तरी या दुधेभावी व भागात पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे तरी प्रशासन ग्रामपंचायत व सबंधित आधिकारी यांनी त्वरित कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व पुढील अनर्थ टाळावा अशी मागणी माजी उपसभापती कोंडाजी आप्पा पाटील, खाजासो खाटीक , दादासो दुधाळ ,आबासाहेब दुधाळ,गौतम साबळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील, जीवन साबळे,प्रकाश पाटील, सादिक खाटीक ,संभाजी फोंडे व अन्य नागरिक यांनी केली आहे