प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर दोन चार चाकी गाड्यांची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान,उंब्रज कडून पाटणच्या दिशेने जाणारी चार चाकी गाडी रस्त्यावर पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमध्ये आदळल्यामुळे गाडीचा टायर फुटला व पाटण कडून उंब्रजच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली.दरम्यान अपघातानंतर जखमींना उपचारासाठी त्वरित हलवण्यात आले.
अपघाताची माहिती लागताच उंब्रज पोलीस त्वरित अपघात स्थळी दाखल झाले. पोलिसांना मदत कार्यामध्ये पोलीस पाटील जयसिंग येळवे,पत्रकार रघुनाथ थोरात,अरुण बाकले,दत्तात्रय थोरात, मच्छिंद्र थोरात यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या