प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
पिलीव येथील नितीन वामन वाघमारे वय ३५ हे २१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अकलुजहुन पिलीवकडे येत असताना निमगाव पिलीव रस्तावर झिंजेवस्ती गावच्या हद्दीत ६५ फाटयानजीक अज्ञात वाहनाने नितीन यास जोराची धडक दिल्याने जागीच मयत झाला.
अज्ञात वाहन चालकाने अपघातग्रस्त नितीन यास उपचारासाठी दवाखान्यात न नेता पळुन गेला असल्याची तक्रार नितीनचे मामा निखील सेवक बनसोडे यांनी माळशिरस पोलीस ठाणयात दिली आहे. यानुसार माळशिरस पोलीस ठाणयात गु.र नं ३१८/२०२४ बी एन एस कलम 281,125(a) ,125(b) ,10(1), एम व्हि अॅक्ट 134a,134b,183,184 प्रमाणे गुन्हा दाखल करणयात आला आहे.
या अपघाताची माहिती समजताच पिलीव पोलीस ठाणयाचे हवालदार धनाजी झगडे झगडे यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणयात आला.
या घटनेचा अधिक तपास हवालदार धनाजी झगडे हे करीत आहेत. अकलुज – निमगाव – पिलीव रस्त्यावर आतापर्यंत ८ ते ९ अपघात झाले असुन झिंजेवस्ती हद्दीतील हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर सध्या अपघात घडला त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ मोठे खडडे पडले आहेत
यामुळे वारंवार अपघात घडत आहेत .याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणयाची गरज आहेत अन्यथा अजुन किती बळी जाणार याची बांधकाम विभाग वाट पाहतोय की काय .

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या