पिलीव येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यासह पिलीव परीसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महालक्ष्मी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ५ मार्च या दरम्यान भरणार आहे. यानिमित्ताने यात्रा कमीटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ फेब्रुवारी रोजी देवीचा महाअभिषेक व पालखीचे मंदीरात आगमन तसेच यात्रेत औंध येथुन आणलेल्या ज्योतीचे आगमन,२५ व २६ फेब्रुवारी शेळया मेंढयाचा बाजार, २७ फेब्रुवारी ते १ मार्च मोठ्या जनावरांचा बाजार, २ मार्च रोजी मल्लांच्या जंगी कुस्तयांचे आयोजन, शेतमाल व जनावरांच्या बक्षीसासाठी नोंदी,३ मार्च रोजी महालक्ष्मी देवीची रथातुन भव्य मिरवणूक व जनावरांच्या निवडी,४ मार्च रोजी गझी ढोल स्पर्धा व शेतीमालाच्या निवडी,५ मार्च रोजी देवीचा महानैवेद्य ,बक्षीस वितरण कार्यक्रम व रात्री देवीचा छबीना देवीच्या छबीन्याने यात्रेची सांगता. या यात्रा कालावधीत पिलीवपासुन मंदीरापर्यत एसटीची सोय करणयात आली आहे, दूकानदारासांठी यात्रा कमीटीच्या वतीने अल्प दरात जागा उपलब्ध करून देणयात आली आहे, तसेच यात्रेकरुना महावितरणच्या वतीने २४ तास विजपुरवठा केला जाणार आहे, टँकरद्वारे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने यात्रेकरुना २४ तास आरोग्य सेवा ,पशुवैद्यकीय दवाखान्यामारफत जनावरांना पशुवैद्यकीय सेवा , बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवणयासाठी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परीसरात तसेच यात्रेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच वाहतुक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडणयासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती यात्रा कमीटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील , व्हा चेअरमन निशांत बगाडे, खजिनदार नितीन कपने, सचिव शिवाजी पिसे, बाबुराव पाटील,सतीश मदने,लहु पाटील, आनंद पाटील, सहसचिव तुषार बगाडे, डा सौरभ बगाडे, नवनाथ पाटील, प्रवीण जावळे ,आबासाहेब पाटील ,यांच्यासह यात्रा कमीटीच्या वतीने सांगण्यात आले.