दि.२२ रोजी श्री.राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ८ मे १९६८ च्या अधिसूचनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडे सोपवण्यात आलेल्या अधिकारानुसार त्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्यात सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ ( २ माघ, शके १९४५) रोजी श्री.राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१९.०१.२०२४ च्या अधिसूचनेनुसार शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) डॉ. श्रीराम पानझाडे या सार्वजनिक सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे.