
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
माणदेशासह आटपाडी तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक गुरु, लहानांपासून ज्येष्ठांच्या अंतःकरणात विशेष जागा निर्माण करणारे सहृदयी व्यक्तिमत्व, आटपाडी सह माणदेशी इतर तालुक्यातील मागच्या दोन शतकातल्या सर्व घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणारे अभ्यासक, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील साहेबांसह अनेक मातब्बर राजकारण्यांशी निकटचे संबध असणारे सर्वप्रिय,अजातशत्रु, जिंदादील, तपस्वी विचारवंत , विसर पडलेल्या अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वांचे कार्यकर्तृत्व समाजापुढे आणणारे खरेखुरे माणदेशी अवलिया, या मातब्बरांचा इतिहास उकलून दाखविणाऱ्या माणमुद्रा या ग्रंथासह वळणवाटा ( आत्मकथन ), ढगांच्या पालख्या ( कथासंग्रह ), विश्वसाहित्यातील माणदंड ( चरित्र ), श्रीमंत बाबासाहेब देशमुख ( चरित्र ), जगावेगळी माणसं ( व्यक्तीचित्रण ) , ज्ञानदुत (संपादन ), माणदेशी शाहीर जयंत जाधव (संपादन ), जयंत जाधव व्यक्ती आणि वाग्मय (संपादन ), १० शोधनिबंध, मॉरीस फ्रीडमन ( व्यक्ती चित्रण ) इत्यादी अनेक पुस्तकांचे लेखक, साहित्यिक, १२ वर्षे मानवैभव दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक, माय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे आणि इंग्रजीत सुवर्ण पदक मिळविणारे आटपाडी महाविद्यालयातील इंग्रजीचे वरिष्ठ प्राध्यापक, माझे मार्गदर्शक, डॉ . चंद्रसेन जाधव, अॅड चेतन जाधव, इंजिनियर संग्राम जाधव यांचे पिताश्री आणि डॉ . सुप्रिया जाधव, प्रा . अनुराधा जाधव, इंजिनीयर सीमा जाधव यांचे सासरे,
प्रा . विश्वनाथ जाधव सर
यांचे आज दुःखद निधन झाले . त्यांच्या पवित्र आत्म्यास कोटी कोटी प्रणाम, दुवाँ, सलाम .
भावपूर्ण श्रद्धांजली, विनम्र अभिवादन .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती