आटपाडी येथे जॅग्वार सिटीमध्ये प्लॉटधारकांसाठी लकी ड्रॉ व आशा वर्करना सायकल वाटप सोहळा उत्साहात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी येथील जॅग्वार सिटीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते प्रथम 150 प्लॉट खरेदीखत केलेल्या भाग्यवान ग्राहकांचा वचनपूर्ती सोहळा चार चाकी व दोन चाकी गाड्यांचा बक्षीस वितरण समारंभ व आटपाडी तालुक्यातील सर्व आशा वर्कर यांना सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी आणि सिने अभिनेत्री पूजा सावंत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे होते. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. राहुल देशमुख यांनी स्वागत केले. शिवजल ग्रुपचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी प्रास्ताविक केले.खा.संजयकाका पाटील,सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी,सिनेअभिनेत्री पूजा सावंत,अमरसिंह देशमुख यांनी मार्गदर्शन केले.ॲड.रितेश सावंत यांनी ग्रुपबद्दल मनोगत व्यक्त केले.
आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रमोदअप्पा शेंडगे, उद्योजक विनायक मासाळ,पांडुरंग सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोध्या येथे सायकलवर निघालेल्या गोरख अनुसे दिव्यांग बांधवाचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच रामचंद्र जरे,अमोल विभुते,पंढरीनाथ नागणे,रुतुजा पांडुरंग सोनवणे,गणेश कैलास भिंगे यांच्या विशेष कार्याचा गौरव करण्यात आला.भूपेंद्रसिंग राठोड यांचा मनोगत संदेश प्रदर्शित करण्यात आला. ऋतुजा सोनवणे यांनी सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त केले.
फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांच्या लकी ड्रॉमध्ये खालील भाग्यवान विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.
१- प्रकाश मारुती हसबे – टाटा Nexon
२- अमोल विलास मोरे – मारुती स्विफ्ट
३- महेश उत्तम लिंगडे – मारुती वॅगनर
४- दिपाली अमर पांढरे – मारुती अल्टो
५- शिकंदर दस्तगीर मुल्ला – रॉयल एनफिल्ड बुलेट
६- विष्णू आनंदराव जाधव – रॉयल एनफिल्ड बुलेट
७- जगन्नाथ बाळकृष्ण कुलकर्णी – रॉयल एनफिल्ड बुलेट
८- ऋतुजा हेमंत कुलकर्णी – होंडा एक्टिवा
९- शीतल प्रकाश भोसले – होंडा एक्टिवा
नव्याने १५१ ते ३०० क्रमांकाच्या प्लॉट खरेदी धारकांना अमरसिंह देशमुख यांनी नवीन बक्षीस योजना जाहीर केली. सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आली‌.
शिवजल ग्रुप, जॅग्वार सिटी, श्री व्ही एन एस ग्रुप च्या विविध योजनांची व उपक्रमांची व्यवस्थापन मंडळाकडून माहिती यावेळी देण्यात आली.