संग्राम पाटील यांच्या जाण्याने यलमार समाजाचा आधार वड हरपला

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

मंगळवेढा तालुक्यातील येड्राव गावचे सुपुत्र व नवी मुंबईचे बिल्डर संग्राम विलासराव पाटील यांचे शनिवारी रात्री७:३० वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले , ते ५५ वर्षाचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना व एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे, संग्राम पाटील मंगळवेढा – मुंबई मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच यलमार समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या अंत्यविधी रविवार सकाळी ११ वाजता तुर्भे येथील स्मशानभूमीत होणार आहे नवी मुंबई येथील बिल्डर श्रीआनंद पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू तर मंगळवेढ्याचे माजी सभापती श्री भुजंगराव पाटील यांचे पुतणे होते, संग्राम पाटील यांच्या जाण्याने यलमार समाजाचा आधारवड हरपला असेच म्हणावे लागेल कारण संग्राम पाटील यांनी या समाजाची नोंद होण्यासाठी शासन दरबारी बराच प्रयत्न केला.