
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय(आटपाडी कॉलेज,आटपाडी) माजी विद्यार्थी संघ आटपाडी यांचा माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेहमेळावा व्येंकटेश माडगूळकर सभागृह आटपाडी येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .शिवाजीराव भोसले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी स्वतःचा परिचय करून दिला. यावेळेस उपस्थिती माजी विद्यार्थी डॉ. बजरंग कुंभार, ज्ञानेश्वर राक्षे, युवा उद्योजक किशोर जाधव, प्रा. गणेश माने, ॲड.रामचंद्र इनामदार,कुबीर सर, नरेंद्र दीक्षित, भुते सर, पाणी फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा विभागीय अध्यक्ष सत्यवान देशमुख, विद्यार्थिनी सौ.माधुरी शिंदे, आदींनी आपल्या कॉलेज जीवनाच्या आठवणींना मनोगनातून उजाळा दिला. उपस्थित माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना श्रीमंत बाबासाहेब देशमुख विद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले, मा.प्राचार्य जे.आर.चव्हाण सर, प्रा.दिनेश भिंगे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष ॲड.चेतन जाधव, उपाध्यक्ष दिनेश देशमुख, सचिव प्रा.सदाशिव मोरे,प्रा.संजय हजारे,ॲड.विजय सावंत,ॲड.केदार भिंगे, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर स्नेहमेळाव्यासाठी मुंबई,पुणे,सोलापूर इत्यादी ठिकाणाहून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थिती दर्शवली होती.ॲड.चेतन जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती