
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी येथे आज सोमवार दि. ४ डिसेंबर ते ११ डिसेंबर अखेर श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि संस्कार व योग शिबीर वैकुंठभवन, संतपुरी, आटपाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. ह.भ.प. विष्णु महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी यातील विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार दि. ४ रोजी ह.भ.प. केशव लक्ष्मण देशपांडे यांचे प्रवचन,ह.भ.प.सागर महाराज शेवाळे यांचे कीर्तन व देशमुखवाडी येथील हनुमान भजनी मंडळाचा हरिजागर, मंगळवार दि. ५ रोजी ह.भ.प.सौ.सुनंदा रमाकांत क्षीरसागर यांचे प्रवचन, ह.भ.प.अण्णा महाराज भुसनर यांचे कीर्तन व कौठुळी येथील हनुमान भजनी मंडळाचा हरिजागर,बुधवार दि.६ रोजी ह.भ.प. राहुल महाराज फडतरे यांचे प्रवचन, ह.भ.प.डॉ.सुहास महाराज फडतरे यांचे कीर्तन व करगणी येथील विठ्ठल भजनी मंडळाचा हरिजागर, गुरुवार दि.७ रोजी ह.भ.प.कु.ज्योती कावरे यांचे प्रवचन, ह.भ.प.गणेश महाराज डांगे यांचे कीर्तन व दिघंची येथील पांडुरंग भजनी मंडळाचा हरीजागर, शुक्रवार दि. ८ रोजी ह.भ.प.सौ.शुभदा लोहार यांचे प्रवचन, ह.भ.प.सौ.सुवर्णाताई संजय गायकवाड यांचे कीर्तन व अजनाळे येथील ज्ञानेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळाचा हरिजागर, शनिवार दि. ९ रोजी ह.भ.प.पांडुरंग लोहार यांचे प्रवचन, ह.भ.प.शिवदत्त गलांडे यांचे कीर्तन व हातीद येथील श्री दत्त सांप्रदायिक भजनी मंडळांचा हरीजागर,रविवार दि. १० रोजी ह.भ.प.महेश बबन सूर्यवंशी यांचे प्रवचन,ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कौलगेकर यांचे कीर्तन व पुजारवाडी (दि) येथील बाळूमामा भजनी मंडळाचा हरिजागर,सोमवार दि. ११ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत ह.भ.प.शंकर महाराज झाडे यांचे काल्याचे किर्तन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पहाटे ४.३० ते ६.३० या वेळेत काकड आरती,पहाटे ५.३० ते ६.३० दौड, सकाळी ६.०० ते ७.०० योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ओंकार ,इ., सकाळी ८.०० ते १०.३० व दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी २.०० ते २.४५ संस्कार वर्ग,अध्यापन, मूल्यशिक्षण व शंका निरसन, सायंकाळी ५.०० ते ६.०० प्रवचन, ६.०० ते ७.३० हरिपाठ, रात्री ९.०० ते ११.०० या वेळेत कीर्तन, रात्री ११.०० ते १.०० हरिजागर या वेळेत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.११ रोजी सकाळी ७.०० ते ११.३० या वेळेत भव्य पालखी सोहळा, त्यानंतर काल्याचे किर्तन व दुपारी १ ते १.३० या वेळेत ह.भ.प.प्रा.विष्णु महाराज आनंदरावजी जाधव सांगता समारोप करणार असून १.०० वाजता पुष्पवृष्टी व २.०० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त उत्सव समिती, श्री सद्गुरु सेवागिरी महाराज विद्यार्थी सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ आटपाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती