आटपाडीच्या तहसीलदारपदी सागर ढवळे यांची नियुक्ती

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडीच्या तहसीलदारपदी सागर ढवळे यांची नेमणूक झाल्याचे आदेश शासनाने काढले आहेत. तहसीलदार बाई माने यांची वडूज (खटाव )येथे बदली झाली.आज मंत्रालयातून ढवळे यांच्या बदलीचा आदेश झाला. ते मोर्शी जि.अमरावती येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते.