प्रा.प्रवीण भांबुरे यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील श्री.भवानी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील शास्त्र शाखेतील प्रा. प्रवीण भास्कर भांबुरे यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा यांचे निधन झाले.
प्रा. प्रवीण भाबुरे हे दिघंची येथील असून गेल्या अनेक वर्षापासून ते भवानी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करत आहेत. त्यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या.आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पती प्रा.भांबुरे, दोन मुली आहेत.आटपाडी येथे थोड्याच वेळात रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.