श्री . विनायकराव बाळकृष्ण पाटील,
यशस्वी व्यावसायीक आणि प्रगतीशील शेतकरी नेते आटपाडी जि . सांगली . मोबाईल नंबर 9423829851
राजकारण म्हंटले की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय. मतापुरते लांगून चांगून करणाऱ्या , दुसऱ्या निवडणूकीपर्यत या सामान्यांना खिजगणतीत न मोजणाऱ्यांच्या, आजच्या जमान्यात बदनाम झालेल्या या क्षेत्रात, जनतेला जनार्धन मानून त्यांच्या सेवेतच जीवन समर्पित करीत या खऱ्या दैवताला पुजणाऱ्या सध्याच्या मोजक्या राजकारण्यांमध्ये सर्वात आघाडीचे, लक्षवेधी नाव म्हणजे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे होत .
प्रचंड कष्टाळू, पशुधन आणि काळ्या आईला सर्वस्व मानून उन, वारा, पाऊस, दुष्काळ, जंगली श्वापदांचे हल्ले अशा नैसर्गीक संकटांशी सामना करीत, संपूर्ण जीवन हजारो किलोमीटर च्या भटकंतीतून सार्थकी लावणाऱ्या, मनाचा आणि धनाचा आगर असणाऱ्या धनगर समाजाने, महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशभर प्रामाणिक, कष्टाळू, कणखर आणि शुर जमात म्हणून पिढ्या पिढ्याची ओळख निर्माण केली आहे . याच समाजातल्या महापुरुषांनी, महामातांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून जगमान्य, लोकाभिमुख प्रचंड कार्याचा इतिहास निर्माण केला आहे . देव, देश, धर्म आणि जनतारूपी जनार्धनाच्या सेवेसाठी समर्पित झालेल्या, देश – विदेशात प्रचंड र्कीर्ती, ख्याती निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रचंड, लोकाभिमुख आणि लक्षवेधी कार्याचा वसा – वारसा सांगतच हा धनगर समाज जिद्दीने, कष्टाने, न्यायाने, प्रचंड वाटचाल करतो आहे . या प्रचंड ऐतिहासीक कार्य कर्तृत्वाचा मोठा वारसा लाभलेल्या धनगर समाजात जन्मलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने, खऱ्या अर्थाने या समाजाबरोबर देशाला, देशव्यापी नेतृत्व मिळाले आहे . केवळ एका दशकात आपल्या अमोघ वाणी, अभ्यासू मांडणी, बंडखोर वृत्ती आणि चौमुलखी प्रचंड वाटचालीने प्रस्थापित राजव्यवस्थेला जोरदार तडाखे देण्याचे काम त्यांनी केले आहे . चार पाचशे लोकवस्तीच्या पडळकरवाडी या आटपाडी तालुक्यातील छोट्याशा वाडीतून पुढे आलेल्या गोपीचंद पडळकर साहेबांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देशस्तरावरच्या अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांना अंगावर घेत, त्यांना आपल्या सडेतोड वाणी आणि मर्मभेदी प्रश्नांनी निरुत्तर , हतबल करण्याचे काम केले आहे . वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नाच्या शिक्षकाच्या नोकरीत आपले जीवन घडविणाऱ्या या अवलियाने, वाट्याला आलेले सर्व खडतर भोग भोगलेच . तथापि प्रचंड संख्येने देशभर, राज्यभर विखुरलेला धनगर समाज, प्रगतीची, विकासाची वाटचाल करताना, आजही उपेक्षित, वंचित, मागास ठेवला जातो आहे . त्याला सर्वच बाजुंनी हतबल, असहाय्य आणि अगतिक बनविण्याचे प्रस्थापित व्यवस्थांचे षडयंत्र , प्रगतीच्या वाटेपासून धनगर समाजाला अडवते आहे, रोखते आहे हे लक्षात घेऊन या समाजाला सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे . हा समाज राज्यकर्ता समाज बनवायचा . या समाजाचे पुरेसे लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या सर्वच मंदिरामध्ये, योग्य त्या प्रमाणात घालवायचे . आणि स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत हा उपेक्षित, वंचित, भटका समाज, उपेक्षित, मागासला, अडाणी, अंधश्रद्धाळूच रहावा . या कटकारस्थानातून गाव गाड्यात, गावकुसा बाहेर रानोमाळ, धनगर समाजाला भटकवत ठेवणाऱ्यांच्या विरोधात पिवळा एल्गार निर्माण करायचा, आणि या वंचितांची जिंदगी बदलून टाकायची, ही जीवनाची शपथ घेऊन सर्वच क्षेत्रात प्रचंड कार्य करीत असलेल्या गोपीचंद पडळकर यांची सुरु असलेली गरुडझेप पाहता, राज्य और देशका मुखिया बनने से कोई गोपीचंदजी को रोख नहीं सकता . अब वो दिन दूर नही . असेच एकंदर दैदिप्यमान वाटचालीकडे पाहता अभिमानाने म्हणावेसे वाटते . गोपीचंद पडळकर यांचा हा झंझावात संपूर्ण देश पाहतो आहे .
आमदार गोपीचंद पडळकर या लोकाभिमुख नेत्याचा , उद्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, भविष्यातल्या देशाच्या पंतप्रधानांचा मी एक कार्यकर्ता आहे . याचा माझ्या सारखा मराठा समाजातला उच्चशिक्षित तरुणाला अभिमान वाटतो आहे . मी स्वतःला भाग्यवान समजतो आहे . अत्यंत कमी वयात, सन्मानाने आमदारकी मिळविणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची राज्यभर प्रचंड लोकप्रियता आहे . राज्यभरातल्या अनेक ठिकाणच्या लाखोंच्या संख्येतल्या सभा, विविध आंदोलनासाठी त्यांना राज्यभर मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि एका संदेशावर एकवटणारे, जीवाला जीव देणारे हजारो गोपीसैनिक हेच शक्तीस्थान, बलस्थान असणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी, विकास म्हणजे काय ? विकास कशाशी खातात, विकासाच्या नावाखाली कसा चुना लावला जातो. विकासाच्या नावावर अनेक पिढ्या कशा स्थिरस्थावर करता येतात . याची चढाओढ लागलेल्या राजकारण्यांच्या प्रचलित जमान्यात, नि:स्पृहपणे शेकडो कोटींच्या कामांना राज्यभर गती देण्याचे, सर्वसामान्यांचे हित साधण्याचे काम गोपीचंद पडळकर यांनी करून आपण डबक्यातले पुढारी नसल्याचे कृतीतून सिद्ध केले आहे . अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठी खरोखरच पात्र असणाऱ्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण समावेशाच्या देशभराच्या लढ्यात यशाच्या जवळ नेण्याचे काम गोपीचंद पडळकर नावाच्या आधुनिक क्रांतीकारकाने केल्याचे माझ्या सारखे लाखो, सर्व धर्मीय, सर्व जाती, जमातींचे लोक मान्य करतील . राज्यातल्या अनेक प्रश्नांवर विधान परिषद गाजविणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी आपल्या उच्च स्तरीय नेतृत्वाची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे .
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजीक, राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केलेल्या गोपीचंद पडळकर यांनी, आज राज्याचे नेते, माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गत पंचवार्षीक मध्ये विविध राज्यात निर्माण केलेला झंझावात, भारतीय जनता पक्षाच्या राज्य – देशस्तरावरच्या अनेक महनीय नेत्यांच्या कौतुकाचा विषय बनला असून या प्रत्येकांच्या पाठबळाने, हे नेतृत्व दिवसेंदिवस अधिकाधिक उच्च कोटीचे बनू लागले आहे . भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात अस्तित्वात आलेल्या आणि प्रचंड प्रमाणात काम मार्गी लागलेल्या टेंभू योजनेच्या रखडणाऱ्या कामांना प्रचंड गती देण्याचे काम गोपीचंद पडळकर साहेबांनी वेळोवेळी केले . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडींच्या परिषदा, आंदोलनात सहभागी होणारा लहान कार्यकर्ता ते टेंभू चे प्रशासन दणाणून सोडणारा, प्रसंगी कार्यालय फोडणारा, कोणालाही न जुमानता अडचणीतल्या शेतकऱ्यांसाठी स्वतःच पाणी सोडणारा, या प्रश्नी विधानपरिषद गाजविणारा नेता म्हणूनच गोपीचंद पडळकर यांचे पाणीदार नेतृत्व सर्वत्र ओळखले जाते .
विधानसभा, लोकसभेच्या निवडणूकीत लक्षवेधी मते मिळवून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या गोपीचंद पडळकर साहेबांच्या रूपानेच भविष्यात मोठा इतिहास घडणार आहे याची मला खात्री आहे . स्वातंत्र्या नंतरच्या पंचाहत्तरीत खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघातला निर्वाचित आमदार अद्याप राज्य – देशपातळीवर मंत्री बनू शकला नाही . एक दोन अपवाद वगळता १२ वेळा आटपाडी तालुका आमदारकी पासून वंचित ठेवल्याचा काळा इतिहास बदलण्याची धमक फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर यांच्या लढवय्या नेतृत्वात आहे . खानापूर – आटपाडी मतदारसंघातून आटपाडीचे गोपीचंद पडळकर हेच आमदार बनत, मंत्री झाल्याचे एक – दोन वर्षातले वास्तव जुना इतिहास निश्चितच मोडून काढेल . आटपाडीचे सुपुत्र श्री . राम नाईक साहेब मुंबईतून अनेकवेळा आमदार, खासदार बनले . केंद्रात मंत्रीही झाले . उत्तरप्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्याचे राज्यपाल ही झाले . तथापि हे आटपाडीकर राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती बनू शकले नाहीत . माणदेशी माणसांची ही खंत गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने भविष्यात संपुष्टात येईल . इतका प्रचंड विश्वास गोपीचंद पडळकर साहेबांच्या, सिंहाच्या ताकदीच्या गरुडाच्या भरारीच्या आणि राजहंसाच्या अचुकतेच्या माध्यमातून माझ्या सारख्याला वाटतो आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर, भारताचे पंतप्रधान गोपीचंद पडळकर हे येणाऱ्या दोन दशकातले वास्तव, याचि देही, याचि डोळा, पाहण्याचे भाग्य माझ्यासह जगभर विखुरलेल्या लाखो माणदेशी – आटपाडी तालुका वाशीयांना मिळो हीच गोपीचंद पडळकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना व सर्व गोपीप्रेमींना करोडो करोडो शुभेच्छा . गोपीचंद पडळकर यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि जगमान्य किर्ती मिळो हीच श्री . सिद्धनाथ, श्री . मायाक्कादेवी, श्री . बिरोबा, श्री . बाळूमामा यांच्या चरणी नम्र प्रार्थना .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती