औसा, प्रतिनिधी/ मुख्तार मणियार:
धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे रक्तरंजित निवेदन औसा तालुका धनगर ऐक्य अभियान हक्क यांच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले.
धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित करण्यात आलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करावी व एक हजार कोटी रुपयांची तरतूद त्वरीत करण्यात यावी,मेंढपांळावरील हल्ले थांबवून त्यांना सरंक्षण देण्यात यावे, धनगर समाजाला एस. टी. प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी,या मागणीसाठी सरकारने गांभीर्याने विचार करून धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रमध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा औसा तहसिलदार यांना रक्तलिखीत निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी औसा तालुका समन्वयक औदुंबर बरडे,महादेव कांबळे,विठ्ठल बरडे, प्रभाकर कांबळे,अभिषेक टोपे आदि उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद