भाजपा विद्यार्थी आघाडीचे आ.पडळकर यांना दुरुस्तीसाठी निवेदन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
इयत्ता १२ मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना JEE (MAIN &ADVANCE) प्रवेशासाठी CBSE च्या धर्तीवर इयत्ता १२ वी साठी गुणांची टक्केवारी Best of 5 विषयांचे गुणदान देण्यात यावेत,तसेच १२ वी साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातील विद्यार्थ्यांना १० वी प्रमाणे जर चित्रकला,योगा यांचे श्रेणीप्रमाणे गुणदान दिले जातात,ते गुणदान दहावीमध्ये वापरले नसल्यास बारावी परीक्षेस वापरलेस NTA परीक्षेचा ७५ टक्के गुणाचा निकष पूर्ण होण्यास मदत होईल, म्हणून महाराष्ट्र शासन यांनी इयत्ता १२ वी च्या परीक्षेत सदरील विषयाचा विचार करून सन २०२४ पासून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्रीय परीक्षेस प्रविष्ट होण्यास संधी उपलब्ध करून द्यावी, याकरिता आज आमदार गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र दिक्षीत यांनी निवेदन देऊन मागणी केली. यावेळी युवानायक अनिलशेठ पाटील,भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग,भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष यल्लापा पवार तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विस्तार अधिकारी अशोक म्हेत्रे यांनी उगम केलेल्या या प्रश्नांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव खटके यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून हा प्रश्न पुढे मांडण्यात आला आहे.
आमदार पडळकर यांना दिलेल्या मागणीत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे आयोजन दरवर्षी केले जाते. या परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या धर्तीनुसार आयोजित केले जातात.
सध्या महाराष्ट्र राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा एकूण गुण 600 प्रमाणे घेतल्या जातात. परंतु सीबीएससीच्या परीक्षा 500 गुणांच्या होऊन गुणांची टक्केवारी घोषित केली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात 600 गुणांची परीक्षा घेऊन त्यापैकी बेस्ट ऑफ फाईव्ह या सर्वाधिक चांगल्या विषयात मिळालेल्या गुणांवरून शेकडा निकाल तयार होऊन गुणदान दिले जातात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांचे मुलांना मिळालेले गुणदान समप्रमाणात धरले जाते.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा एकूण गुण 600 प्रमाणे घेतल्या जातात. परंतु सीबीएससी परीक्षा इयत्ता बारावी 500 गुणांच्या घेऊन गुणांची टक्केवारी घोषित केली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात इयत्ता बारावी गुणांचे मूल्यांकन 600 पैकी बेस्ट ऑफ फाईव्ह या चांगल्या मिळालेल्या गुणांवरून शेकडा निकाल तयार करण्यात यावा.
इयत्ता बारावी शास्त्र शाखेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत संस्था जे ई ई मेन्स अँड ॲडव्हान्स परीक्षा घेऊन केंद्रीय आय आय टी व एन आय टी या महाविद्यालयात बी टेक., बी.ई. साठी प्रवेश दिला जातो.
सदरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेने 2023 पासून इयत्ता बारावी साठी 75 टक्के गुण असतील असे सदरील परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी होतात असा निकष लागू केला आहे. परंतु सीबीएससीचे विद्यार्थी 500 पैकी इयत्ता बारावी परीक्षा देऊन जास्त टक्केवारी घेऊन पात्र होतात आणि महाराष्ट्र राज्यातील राज्य शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावी परीक्षा ६०० पैकी देऊन गुण टक्केवारी कमी प्रमाणात होते व त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ कमी प्रमाणात मिळतो. त्यासाठी
जे ई ई मेन्स अँड ऍडव्हान्स प्रवेशासाठी सीबीएसईच्या धर्तीवर इयत्ता बारावीसाठी गुणांची टक्केवारी बेस्ट ऑफ फाईव्ह विषयांचे गुणदान देण्यात यावे.
तसेच इयत्ता बारावी साठी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीप्रमाणे जर चित्रकला, योगा यांचे श्रेणी प्रमाणे गुणदान दिले जातात, ते गुणदान इयत्ता दहावी मध्ये वापरले नसल्यास इयत्ता बारावी परिषद वापरलेस एन टी ए परीक्षेचे 75 टक्के गुणाचा निकष पूर्ण होण्यास मदत होईल.
या दोन बाबीची महाराष्ट्र शासन यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत सन 2024 पासून लागू करून महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रविष्ट होण्यास संधी उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती