
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/लिंगीवरे:
राजेवाडी येथील कु.नेहा अरुण मोरे या विद्यार्थिनीचे आकस्मित दुःखद निधन झाले.

नेहा मोरे ही यावर्षी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली होती. तिने अकरावीसाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयात तिने दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.सदैव हसतमुख, शांत व मनमिळावू स्वभावामुळे तिचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व शाळेतील सर्वांना आपुलकीचे वाटत होते.अचानक बुधवारी तिचे दुःखद निधन झाले. तिच्या निधनाची वार्ता समजताच विद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग हळहळला.तसेच राजेवाडी परिसरात व नातेवाईकांमध्ये तिच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यालयात धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्रद्धांजली अर्पण केली. तिच्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर सावरण्याचे कुटुंबियांना बळ देवो अशी प्रार्थना करण्यात आली.
गुरुवारी सकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवार दि. ८ रोजी राजेवाडी येथे रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती