प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला असून यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवारांनी थेट ४० आमदारांना आपल्या समवेत आणत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आता राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती