देवानंद जावीर
सांगली/प्रतिनिधी:
सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त यांनी हक्काचा लाभ व न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले असताना अद्यापपर्यंत लाभ मिळाला नसल्याने बांधकाम कामगार आयुक्तालय सांगली येथे असंघटित कामगार संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष शंकरदादा माने व स्वराज्य जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अजितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
कोरोना रोगाच्या महामारीचा कहर चालू असताना बांधकाम कामगारांच्या हाताला काम नाही.त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंडळामार्फत बंद दरम्यान दोन हजार रुपये दिले गेले आहेत,त्यामधील काही कामगारांना अजून मिळालेले नाहीत. ते 2000 रुपये एक वेळेचा बाजार करण्यासाठी सुद्धा पुरले नाहीत. तरी प्रत्येक कामगारांना किमान सात हजार रुपये द्यावेत. परंतु तो विषय आपल्या अधिकारांमध्ये नाही.परंतु कामगारांच्या विविध योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे हे आपल्या अधिकारात आहे. हजारो कामगारांचे अर्ज निकाली काढून आपण या महामारीच्या काळात कामगारांना जगण्याचा मार्ग निर्माण करून द्यावा.कामगार आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता जी आश्वासने दिली गेली आहेत ती सोमवारपर्यंत पूर्ण नाही केल्यास कामगारांपुढे रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. कारण आता उपाशी मरण्यापेक्षा आपल्या कामगार मंडळाच्या जिल्हा कार्यालयासमोर मरण्याचा मार्ग उरला आहे असा इशारा शंकर दादा माने,अजित कदम यांनी आंदोलनादरम्यान दिला.यावेळी उपस्थित शहाजी केंगार,मन्सूर आत्तर,बापू करडे,विजय वाघमारे,मीनाक्षी पाटील,अश्विनी मोरे,टिपू सुलतान, सविता कुंभार उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन