महिला,अपंग,शिक्षणसेवक व ५५ वर्षेवरील प्राथमिक शिक्षकांना कोविड-19 होम टू होम सर्वेक्षण कार्यक्रमातून वगळण्यात यावे

आटपाडी प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

आटपाडी/प्रतिनिधी:
नियोजित covid-19 कुटुंब सर्वेक्षण कार्यक्रमातून महिला,अपंग,शिक्षण सेवक व 55 वर्षेवरील शिक्षकांना वगळण्यात यावे.अशी मागणी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन लंगुटे तसेच आटपाडीचे गटविकास अधिकारी शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षणसेवक हे मानधन स्वरूपावर कार्यरत असल्याने त्यांना नियमित शिक्षकांप्रमाणे कोणत्याही शासकीय सोयीसुविधा नाहीत.दुर्दैवाने एखादी अघटित घटना घडली तर त्यांच्या कुटुंबियांना covid-19 अंतर्गत असणारे संरक्षणाचे लाभ मिळणार नाहीत.तरी त्यांना आग्रहाने सदर कामातून वगळण्यात यावे.यावेळेस सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी.जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे ,ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश हेगडे,भास्करराव डिगोळे,संजय कबीर,प्रवीण बाड, अजय राक्षे ,श्रीकांत कुंभार आदी उपस्थित होते.