
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी येथील कदम हॉस्पिटलचे डॉ.एम.बी.कदम यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आटपाडी तालुक्यासह त्यांचे मूळगाव शेनवडी ता.माण परिसरावर शोककळा पसरली.
सदैव हसतमुख,वाड्या-वस्तींवरील गोरगरीबांना पैसे असोत अथवा नसोत उत्तम उपचार करणारे, मनाची श्रीमंती जपलेले, व्यायामाची आवड जोपासलेले डॉ.एम.बी.कदम मुळचे शेनवडी ता.माण या गावचे सुपुत्र होते.ते सद्या आटपाडी स्थित होते.मनमिळाऊ, गोरगरिबांचे आधारवड, सर्व उपचारांबरोबर विनोद करुन हसवून बरे करणारे अशी त्यांची जनमानसात ख्याती होती.त्यांच्या निधनाने आटपाडी तालुक्यासह शेनवडी ता.माण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती