
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री होत्या.
जिजाबाई व विठ्ठल सातपुते यांनी प्रतिकूल परिस्थितीत संसार करून आपल्या मुलांना चांगले संस्कार व उच्च शिक्षण दिलेले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्ष ऊसतोड कामगार म्हणून काम केलेले आहे. त्यांचा मुलगा राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याचे आमदार होण्याचे भाग्य लाभलेले आहे. दोन-तीन महिन्यापासून दवाखान्यांमध्ये औषध उपचार सुरू होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती