

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे सहशिक्षक धर्मेंद्र पांडुरंग मगदूम यांना शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेमार्फत यावर्षीचा आदर्श सभासद शिक्षण सेवक पुरस्कार सांगली येथे प्रदान करण्यात आला.
शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचा ९० वा वर्धापन दिन व आदर्श सभासद/सेवक शिक्षण सेवक पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे मार्केट यार्डमधील वारणा सांस्कृतिक हॉलमध्ये राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये आबासाहेब शिंदे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब आप्पासाहेब शिंदे म्हैसाळकर, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे मार्गदर्शक समितीचे सदस्य आप्पासाहेब मासुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जनार्धन झिंबल,श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश बाबुराव बन्ने, व्हाईस चेअरमन निलांबरी राजेंद्र पाटील,ऑन. सेक्रेटरी व संचालक संजय कुंभार, सर्व संचालक मंडळ तसेच श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे सहशिक्षक सुरेश पुजारी, संतराम मदने, लक्ष्मण खटके,रामराव खटके,लिपिक ब्रह्मदेव खटके, शिक्षकेतर कर्मचारी हणमंत खटके यांच्यासह पोपट काळे, मगदूम यांचे कुटुंबीय व नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन