शेंडगेवाडी स्वतंत्र!

महसुली गावाचा दर्जा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी या गावाला प्रचलित नावानेच स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या 24 एप्रिल 2023 च्या राजपत्रात काढण्यात आली आहे. 20 एप्रिल पासून सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी येथील वाडीला शेंडगेवाडी या प्रचलित नावाने स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत शेंडगेवाडी या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे. नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमणूक दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या येण्याचा हक्क अबाधित राहील असे नमूद करण्यात आले आहे.
शेंडगेवाडी येथील मूळ गट नंबर 3278 ते 3405 या गटांचा समावेश करण्यात आला आहे,तर उर्वरित गट नंबर एक ते 3277 व 3406 ते 4218 हे गट आटपाडी महसुली गावातच आहेत.
या शेंडगेवाडी गावामध्ये एकूण 92 कुटुंब संख्या असून 692 लोकसंख्या आहे. 128 गट नंबर व 455.06 इतके गावाचे क्षेत्र आहे. अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख पाटील यांनीही अधिसूचना काढली आहे.