
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी ग्रामपंचायतीची सन २०२२-२३ या सालातील नियमित कर वसुली शंभर टक्के पूर्ण झाली आहे.
मासाळवाडी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतची पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती व आरोग्य कर १००% वसूल व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी विशेष प्रयत्न करून ही करवसुली शंभर टक्के केली होती. त्याच्या मदतीने याही वर्षी त्यांनी ग्रामपंचायतीमधील प्रत्येक मालमत्ताधारक करदात्याला कर नियमितपणे भरण्याबाबत प्रेरित केले होते. त्यानुसार वर्षभरामध्ये पाठपुरावा करून यावर्षीची घरपट्टी,पाणीपट्टी, दिवाबत्ती कर व आरोग्य कर हे सर्व कर वसूलकर वसूल करून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.त्याबद्दल प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सरपंच सखुबाई तळे, ग्रामसेवक पुनम गेजगे, उपसरपंच राहुल राक्षे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने ग्रामपंचायतीमधील दादासो तळे यांनी विशेष प्रयत्न करून यासाठी वर्षभर सातत्याने पाठपुरावा केला.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन