आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३७ उमेदवार रिंगणात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज २० एप्रिल रोजी अर्ज माघारी घेतल्यानंतर ३७ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून एकूण 69 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 55 अर्ज माघारी घेण्यात आले असून 14 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटातून 14 जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी दहा जणांनी अर्ज परत घेतला असून चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटासाठी पाच जणांनी निवडणूक अर्ज दाखल केला होता. त्यापैकी तिघाजणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सध्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती गटामधून आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी सहा जणांनी आपले अर्ज माघारी घेतले असून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून वीस उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरला होता. त्यापैकी 16 जणांनी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज परत घेतला असून चारजण निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गातून दहा जणांनी निवडणूक अर्ज दाखल केला होता त्यापैकी आठ उमेदवारांनी आपला अर्ज परत घेतला असून दोघाजणांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून नऊ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सात जणांनी आपले अर्ज माघारी घेतले असून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आडते व व्यापारी गटातून 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 12 उमेदवारी अर्ज परत घेतले असून पाचजण निवडणूक रिंगणात आहेत. हमाल व तोलाईदार गटातून पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी तिघांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला असून दोघेजण निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. 157 पैकी 120 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले असून 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.