आवळाईजवळ गळफास घेऊन एकाची आत्महत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील व सध्या वारणाली, सांगली येथील ३५ वर्षीय इसमाने जमीन खरेदीच्या फसवणुक प्रकरणात जाचाला कंटाळून आटपाडी तालुक्यातील आवळाईजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापगोळा असे आत्महत्याग्रस्त इसमाचे नाव आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की,ज्ञानेश्वर मायाप्पा पुंजापगोळा, वय 35 वर्षे मूळ रा.बाळगिरी, ता.अंथणी जि. बेळगाव सध्या रा.सत्यसाईनगर,वारणाली, विश्रामबाग, सांगली यांना अमित शिंदे, स्नेहा मघदुम दोघेही रा. सांगली तसेच उल्हास मारुती साळुंखे रा. दिघंची ता.आटपाडी जि. सांगली यांनी सविता ज्ञानेश्वर पुजापगोळ व त्यांचे पती यांना दिघंची येथील दुसऱ्याची जमीन दाखवून जमीन खरेदीसाठी तीस लाख रुपये घेऊन फसवणूक करून जमीन ज्ञानेश्वर यांच्या नावावर करून न देता त्यांनी जमीन खरेदीसाठी घेतलेले तीस लाख रुपये परत न दिल्यामुळे ज्ञानेश्वर यांनी पैशाची त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली असता त्यांनी पुन्हा पैशाची मागणी केली तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरी यांनी 15 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आवळाई गावाजवळील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला अमित शिंदे, स्नेहा मघदूम व उल्हास साळुंखे जबाबदार आहेत. फसवणूक करून धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सविता यांनी आटपाडी पोलिसांमध्ये दिली आहे. याप्रकरणी संशयित तिघांवर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.