प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
करगणी येथील रामनगर भागातील शेतातून रामचंद्र गणपत पवार यांचे इंजिन व एचटीपी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.
याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रामनगर भागातील रामचंद्र गणपत पवार यांच्या शेतातील दोन हजार रुपये किंमतीचे एचटीपी व तीन हजार रुपये किंमतीचे एक कॉमेंट कंपनीचे इंजिन अज्ञात चोरट्यांनी २९ जानेवारी रोजीच्या रात्री ७.००पासून ३० जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद रामचंद्र पवार यांनी आटपाडी पोलीसात दिली असून पोलीस हवलदार पाटील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती