आटपाडी तालुक्यातील आणखी एका अल्पवयीन मुलीला पळविले

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला भूस लावून पळून नेल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून सोहेल युनुस खाटीक वय २० रा.आटपाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील अकरावीच्या वर्गात शिकणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून शाळेला जाते असे सांगून शाळेला आली. तिला सोहेल युनूस खाटीक याने आमीष दाखवून पळून नेले आहे. याबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून घटनेचा तपास पोलीस हवालदार मिसाळ करीत आहेत.