

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
माळशिरस तालुक्यातील अनेक गावातील रेशनकार्ड अचानकच आनलाईन वरुन रद्द होत आहेत. यामध्ये रेशन दुकानदारांनी कुटुंबातील सर्वांची आधारकार्ड लिंक करुन नावे आनलाईन केली होती.रितसर त्यांना रेशनचा मालही मिळत होता पण गेल्या काही दिवसापासून माळशिरस तालुक्यातील अनेक गावातील रेशनकार्ड धारकांची नावे आपोआपच रद्द झाली आहेत .सदरच्या कुटुंबातील व्यक्ती रेशन आणण्यासाठी दुकानात गेल्यावर त्याठिकाणी आनलाईनला नावच नसल्याचे पाहवयास मिळत आहे. यामध्ये रेशन दुकानदारांनचा काहीच दोष नाही पण कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आधारकार्ड लिंक केलेले नसेल किंवा आधारकार्डवर पत्ता चुकीचा असेल तर अश्या कुटुंबाची रेशनकार्ड आपोआपच रद्द होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तर माळशिरस तालुक्यात जवळपास विस हजार रेशनकार्ड रद्द झाली आहेत.यामुळे रेशनकार्ड धारकामध्ये सध्या धास्ती असुन माळशिरस तालुक्यातील गावा गावात सध्या याची चर्चा सुरु आहे. मात्र कागदपत्रे सदरच्या रेशन दुकानदारांकडे दिली किंवा पुरवठा विभाग याठिकाणी दिली असता त्या कुटुंबाचे रेशनकार्ड पुर्ववत सुरू होत आहे. पण सध्या अश्या प्रकारे रेशनकार्ड अचानक रद्द झाल्यामुळे गावगाडयातील व्यक्तीमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती