
लिंगीवरे येथील नवरी,दिघंची येथे लग्नकार्य!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथील नववधू आपल्या डोईवर अक्षदा पडताच पुढील काही अवधीतच लोकशाहीने बहाल केलेला मताधिकार बजावण्यासाठी लग्न मंडपातून थेट मतदान केंद्रावर पोहोचली.
आटपाडी तालुक्यातील लिंगीवरे येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आत्माराम भिवा खटके व सौ.कविता यांची कन्या प्रियांका आत्माराम खटके हिच्या लग्नकार्याची तिथी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होऊन मतदानाची तारीख आयोगाने जाहीर केली. दोन्हीही कार्यक्रम एकाच दिवशी आले. ठरवलेल्या तिथीमध्ये कोणताही बदल करणे नियोजनाच्या दृष्टीने त्रासाचे होऊ लागले.
लिंगीवरे ग्रामपंचायतीसाठी आज निवडणूक आयोगाने मतदान घेतले. त्यामधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रियांका आत्माराम खटके या मतदार असलेल्या आजच्या नवरीचे मतदार यादीमध्ये नाव होते. लग्नकार्य असतानाही आपला मताधिकार बजावून लोकशाहीला बळकट करण्याचा निश्चय केलेल्या या नवरीने दुपारच्या मुहूर्तावर शुभमंगल कार्याचा विधी उरकून लगेचच दिघंची या गावाहून लिंगीवरे येथे येऊन मतदानाचा हक्क बजावला. लग्न मंडपातील स्टेजवरून थेट मतदान केंद्रांमध्येच ही नवरी दाखल झाली.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक