कवठेमहांकाळ येथे माजी मंत्री शिवाजीरावबापू शेंडगे यांची जयंती साजरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ

कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी कार्यालय येथे पक्षाच्यावतीने समाजरत्न माजी राज्यमंत्री स्व.शिवाजीरावबापू शेंडगे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक राहुल जगताप यांचे हस्ते फोटो पूजन करण्यात आले.राष्ट्रवादीचे नेते संजय कोळी यांनी शेंडगेबापूंविषयी बोलताना सांगितले की, कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात शेंडगे बापूंनी खूप मोठे काम केलेले आहे.एमआयडीसी बापूंनी आणली. तसेच कवठेमहांकाळ शहर जे आज पाणी पीत आहे,ती पाणी पुरवठा योजना स्व.शेंडगेबापूंनी मंजूर करून आणली. त्यामुळे बापूंच्याविषयी या शहरातील जनता नेहमी ऋणी राहील असे सांगितले.
यावेळी अभिवादन करताना उपनगराध्यक्ष बद्रुदीन शिरोळकर, ओबीस जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी, शहर अध्यक्ष महेश पाटील, शहर उपाध्यक्ष ईश्वर वनखडे, ओबीस सेलचे तालुका अध्यक्ष अजित लाटवडे, तालुका कार्याध्यक्ष शहाजी दोडमिसे, शहर अध्यक्ष संजय माळी, शहर उपाध्यक्ष फैय्याज मुल्ला, युवक शहर उपाध्यक्ष विशाल रसाळ, प्रभाग क्रमांक ७ चे नेते संजय कोठावळे, अफजल शिरोळकर उपस्थित होते.